*कोकण Express*
*भाजपकडून सावंतवाडीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर “विचारमंथन” सभेचे आयोजन..*
भाजपाच्या माध्यमातून दि.16 ला सावंतवाडी येथे जिल्हा कार्यकारिणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय स्तरावरील प्रश्नांसोबत जिल्हास्तरावरील प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे. या बैठकीत माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. ग्रामविकास मंत्र्यांच्या माध्यमातून माध्यमातून पाच तालुक्यांना चार कोटीचा निधी उपलब्ध झालाय यावेळी राजन तेली माजी नगराध्यक्ष संजू परब मनोज नाईक आनंदने योगी शहराध्यक्ष अजय गोंदावले तालुकाध्यक्ष महेश धुरी उपस्थित होते.