*कोकण Express*
*जगज्जेता शीळवादक निखिल राणे यांचे गाणे होतेय लोकप्रिय*|
*कासार्डे ; संजय भोसले*
अभिनेता अभिजित केळकर आणि जागतिक शीळवादन स्पर्धेचा विजेता द स्माईलिंग व्हिसलर निखिल राणे यांनी सादर केलेल “चेहरा हैं या चांद खिला है” हे गीत खूपच लोकप्रिय होत आहे. निखिल राणे हे जाणवली येथील असून ते सलग दोनवेळा शिळवादन स्पर्धेत जगज्जेते आहेत.
काही कामानिमित्त अलिबाग किहीम बीचवर रेंगाळत असता अभिनेते अभिजित केळकर आणि द स्माईलिंग व्हिसलर ऑफ इंडिया निखिल राणे यांनी ऐन सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर “चेहरा है या चांद खिला हैं” हे गाणं सादर करत त्याचा विडिओ शूट केला. अभिजित यांचा आवाज आणि निखिल यांची हसरी शीळ हे कॉम्बिनेशन तुम्हाला नक्की आवडेल. हा विडिओ अभिनेते अभिजीत केळकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर नुकताच पोस्ट केला आहे. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे