*कोकण Express*
*शिवसेनेच्या निरवडे येथील मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सुमारे ६५० कार्यकर्त्याचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निरवडे येथील मेळाव्यात पक्षप्रवेश झाला. सुमारे ६५० पदाधिकारी व कार्यकर्ते निरवडे येथील सुभाष मयेकर, संदीप पाढरे, दशरथ मल्हार, गणपत जाधव, सह नागरिकांचे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी शिवबंधन बांधुन स्वागत केले.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, मतदार संघाचे बाळा गावडे, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना युवानेते संदेश पारकर, विधानसभा समन्वयक अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,राजू नाईक, दोडामार्गचे बाबुराव धुरी, शब्बीर मणीयार, राजू मुळीक, आबा सावंत, राजू मुळीक, सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, संजय तानावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेनेवर श्रद्धा अशी असावी हे आमदार वैभव नाईक यांच्या कडून शिकावे. दिपक केसरकर यांचा शिवसेना प्रवेश केव्हा. ते शिवसेनेवर बोलताहेत. आयत्या बिळात नागोबा सारखा मंत्रीपदासाठी घुसल्याने वैभव नाईक यांची मंत्री पद संधी हुकली. गोव्यातील हॉटेल बसून काय काय केले ते जाहीर करावे लागेल. शिवसेनेला सोडचिठ्ठी देताना उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बोलताहेत. केसरकर थापाड्या. नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात लिहित आहे म्हणून पत्रकार शशिकांत वारीस यांचा खून झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत किती खून झाले, हे कोणी केले. शशिकांत वारीस कुटुंबाचा आक्रोश सुरू आहे. गरिबांच्या कुटुंबीयांना त्रास देत आहेत… जुन्या जाणत्या भाजपाच्या तोंडचा घास हिरावून घेऊन नारायण राणे, दिपक केसरकर मस्ती दाखवित आहेत. तुम्ही या बाटग्यांना कंटाळून आले आहेत.
खासदार विनायक राऊत म्हणाले, राज्यातील १३ खासदार आणि ४० आमदार खेकड्यांची औलाद आहे. आदीत्य ठाकरे यांना नव्हे गद्दाराना मेंटल हॉस्पिटलची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे पक्षाध्यक्ष सारे वरचेवर मुंबई मध्ये येताहेत. इथले आमदार, मंत्री दिपक केसरकर यांनी मतदार संघातील लोकांना वाऱ्यावर सोडले. फक्त थापा मारत आहेत. मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल काय झाले. सावंतवाडी शहरात जागा नसेल तर वेत्ये येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करूया म्हणून आम्ही वेत्ये येथे मल्टीस्पेशलिटी हास्पिटल करूया म्हणून आम्हाला सागतले पण केसरकर यांनी त्याला विरोध केला.
बाबा महाराज केसरकर यांना जमलं नाही. आमदार वैभव नाईक यांना, कुटुंब, ईडी लावली. आमदार वैभव नाईक घाबरले नाहीत. केसरकर जनता तुम्हाला माफ करणार नाही.
राऊत म्हणाले, चिपी विमानतळाच्या जवळपास कोणाची जागा होती. राजन तेली यांनी आम्ही विकास रोखला म्हणत आहेत. पण चिपी विमानतळ व अन्य प्रकल्पासाठी कोणाच्या नावावर जागा घेतल्या गेल्या आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक म्हणाले, शिवसेना पक्ष नसून परिवार आहे. या परिवारात सामील झाले स्वागत करतोय. तळागाळातील शिवसैनिक व जनतेची साथ मिळाली आहे. या मतदारसंघातील आमदार यांनी शिवसेना सोडली तरी जनता शिवसेने सोबत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ४० वार घातले तरी जनता शिवसेने सोबत आहे. उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांच्या वर विश्वास ठेवून प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण केली आणि होत राहतील. शिवसेना संपली म्हणून आवय उठली. महागाई वाढली, गॅस दरवाढ पाहता जनता रोष व्यक्त करेल. अन्याय झाला तर शिवसेना पेटून उठला पाहिजे. चुकीच्या गोष्टींना विरोध केला पाहिजे. सत्तेतून मस्ती दाखविणाऱ्याना धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हा.शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, निरवडे गावाचा विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.
४० आमदार आणि १२ खासदारांनी गद्दारी केली. पण शिवसेनेवर फरक पडला नाही. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या राज्यातील दौऱ्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे.
विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांनी शुभेच्छा दिल्या. विधानसभा मतदारसंघात आजच्या दिवसाचा पासून परिवर्तन लाट उसळली आहे ते निरवडे येथील पदाधिकारी यांनी दाखवून दिले. तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी निरवडे गावाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या वर विश्वास ठेवून प्रवेश केला त्यामुळे मतदार संघात झंझावात निर्माण होईल. मतदार संघाचे समन्वयक अतुल रावराणे म्हणाले, शिवसेना आणि कोकण हे अभेद्य नाते आपण आज दाखवून दिले. शिवसैनिक समाजकारणाला महत्त्व देते. शिवसेना युवानेते संदेश पारकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम गद्दारानी केले आहे. महाराष्ट्र राज्यातील जनता बदला घेण्याच्या तयारीत आहे. आज निरवडे येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून दाखवून दिले. या मतदारसंघातील गद्दार आमदार दीपक केसरकर मिंधे गटात गेले आहेत त्यांचा पराभव करून भगवा झेंडा फडकविणारा शिवसेना आमदार विजयी करून वचका घेण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. आमदार वैभव नाईक,सतिश सावंत यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यामुळे एकजुटीने शिवसेना भगवामय सिंधुदुर्ग करूया.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत म्हणाले, राणे भाजपला जिल्हा बँक मध्ये नोकरी देऊ, चौकशी लावू अशी आश्वासने देऊन कणकवली, देवगड व वैभववाडी येथे प्रवेश घ्यावा लागत आहे. मात्र निरवडे येथील प्रवेश कोणत्याही आश्वासन नाही. मात्र निष्ठेने प्रवेश केला त्यामुळे तुमचे स्वागत आहे. राणे भाजपाची पंचायत समिती व जिल्हा परिषद सत्ता खालसा करून दडपशाही झुगारून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भगवा झेंडा फडकवला पाहिजे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते म्हणाले, शिवसेना प्रवेश केला आहे. तुमची जबाबदारी आता आमच्यावर आहे. शिवसेनेने मोठे केलेल्यांनी,गद्दारी केली. दिपक केसरकर खोटं पण रेटून बोलताहेत. यावेळी प्रास्ताविक तालुका प्रमुख रूपेश राऊळ तर सुत्रसंचलन काका सावंत यांनी केले.