*कोकण Express*
*कणकवली सिद्धार्थनगर कणकवली नगरपंचायत कणकवली यांच्या मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी वाडीतील रहिवाशी सुनील हिंदळेकर व सिकंदर जाधव यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्वागत केले.प्रतीक्षा कांबळे यांनी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे स्वागत केले. अंगणवाडी सेविका सुर्वे बाई यांचे स्वागत देखील करण्यात आले. अंगणवाडी चे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
माजी नगरसेवक गौतम खुडकर, आनंद जाधव, विश्वास कांबळे, महेंद्र जाधव, संदीप कांबळे, सतीश कांबळे, माजी नगरसेविका विशाखा कांबळे, नगरसेविका उर्मी जाधव व अंगणवाडी साठी ज्यांनी जमीन दिली जमीन मालक सिकंदर जाधव व त्यांच्या मातोश्री व वाडीतील सर्व रहिवाशी आदी उपस्थित होते.