कणकवलीतील पाककला स्पर्धेत मधुरा चव्हाण प्रथम

कणकवलीतील पाककला स्पर्धेत मधुरा चव्हाण प्रथम

*कोकण Express*

*कणकवलीतील पाककला स्पर्धेत मधुरा चव्हाण प्रथम…*

*कनकसखी ग्रामसंघचे आयोजन ; द्वितीय क्रमांक दीपा कलिंगण तर तृतीय क्रमांक गौरी तारलीकर…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवलीतील पाककला स्पर्धेत रोशनी बचतगटाच्या मधुरा महेश चव्हाण यांनी प्रथम क्रमांक तर दीपा दत्ताराम कलिंगण यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर ध्रुव बचतगटाच्या गौरी गणेश तारलीकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र आणि कनक सखी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विघमाने तिरंगा थाळी पाककला स्पर्धा झाली. या कार्यक्रमाला हिरकणीच्या अध्यक्ष उदयमती देसाई, डॉ. वैशाली कोरगावकर, अंगणवाडी सेविका श्रीमती पोयेकर व हिरकणीच्या व्यवस्थापिका सीमा गावडे, श्रीमती ओंबळकर, ग्रामसंस्थाच्या अध्यक्ष शितल मांजरेकर, निवेदिता ढेकणे तसेच सर्व गटातील महिला उपस्थतीत होत्या.
कार्यक्रमात पोयेकर यांनी पौष्टिक तृणधान्य आहार बाबत मार्ग दर्शन केले. त्यानंतर तिरंगा थाळी पाक कला स्पर्धा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्योगीनी स्नेहा कदम ह्यांनी केले आभार श्री.कसालकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!