*कोकण Express*
*माजी खा. निलेश राणेंवर गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हाव्यापी आंदोलन*
*युवासेनेची कणकवली पोलिसांकडे मागणी ; उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द केला आरोप..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा नेते,माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले आहेत. शिवसेना खासदार संजय राउत यांनाही मारण्याची धमकी दिली आहे. सोमवार १६ जानेवारी २०२३ ला सायंकाळी ६:२३ वाजता त्यांनी आपल्या ट्विटर वर या संबधीचा व्हिडीओ पोस्ट केला. याप्रकरणी निलेश राणेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन आज कणकवली तालुका युवासेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दिले.
गुन्हा दाखल न झाल्यास युवासेनेच्या माध्यमातून जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे. यावेळी सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, अनुप वारंग, अॅड. हर्षद गावडे, तेजस राणे, गुरु पेडणेकर, आबू मेस्त्री, संदीप गावकर, निलेश परब,भाई साटम, इमाम नावलेकर,प्रतिक रासम, तात्या निकम, स्वप्नील शिंदे आदींसह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.