*कोकण Express*
*प्राणिक हीलींग विना स्पर्श विना औषध मोफत उपचार शिबीर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
प्राणिक हीलिंग व उपचार शिबिराचे कणकवली लक्ष्मी विष्णू हॉल १३ जानेवारी रोजी सकाळी ठिक १० वाजता दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी वेदमूर्ती. प्रसाद देवस्थळी, नितिन गोगटे, सागर मेस्त्री,विनायक शेट्ये, सौ. खडपकर, अमोल जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दत्तप्रसाद पातकर यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार व मुख्य विषयांवर प्रकाश टाकत विविध विषयांवर चर्चा केली.
अमोल जोशी यांनी प्राणिक हिलींगचीं उपयुक्तता व उपचारातील सहजता १३५ देशातील जगमान्यता व या विषयावर माहिती सत्र अतिशय अभ्यास पूर्ण सादर केले. वेदमूर्ती श्री. देवस्थळी यांनी हा उपचार शिकून आलेले अनुभव व वेद शास्त्राशी संबधीत असलेला याचा सहभाग यावर प्रकाश टाकला. नितीन गोगटे यांनी आपल्या घरातच असलेल्या प्राणिक उपचारकाची महती व गंभीर आजाराच्या वेळी मिळालेली मदत असे अनेक प्रसंग सांगितले.
या शिबिरात नोंदणी, चित्रफीतीतून माहिती व उपचाराची प्रणाली, प्रत्यक्ष उपचाराचा अनुभव या विषयावरील अनेक पुस्तकांचे प्रदर्शन, उपचार घेतलेल्यांसाठी समुपदेशन व त्यांचे अभिप्राय हा उपचार शिकण्याकरीता नोंदणी अशी प्रत्येक दालने होती. शंभर पेक्षा जास्त लोकांनी याचा अनूभव घेतला. यात कुडाळ, देवगड, नारंग व कणकवली येथील नागरिक सहभागी झाले. यामध्ये अनेक वेदमूर्ती,नाटयकर्मी, डॉक्टर,न्यूज रीपोर्टर व हा विषय शिकण्यासाठी उत्सुक असणारे नागरिक असा समुदाय होता. मुंबई पुणे अशा शहरात अनेक वर्ष चालत असलेल्या या उपचाराची माहिती सिंधुदुर्ग या माझ्या माहेरघरच्या लोकांनी घ्यावी याचा ध्यास घेतलेल्या स्त्रोत प्राणिक हिलींगच्या रमा पातकर व दत्तप्रसाद पातकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे ,ओंकार लॉज, अन्नपूर्णा हॉटेल, लक्ष्मी विष्णू हॉल, वेदांत हॉटेल, समस्त पोलीस विभाग अधिकारी, नट व रंगकर्मी अभय खडपकर, नितीन गोगटे ,विनायक शेटये ,मान्यता प्राप्त प्रशिक्षक व उपचारक अमोल जोशी, प्राणिक हिलींग उपचार करण्यासाठी खास मुंबई डोंबिवली येथून आलेले १८ प्राणिक हिलींग उपचारक व या शिबीरासाठी मदत करणारे सर्व यांचे आभार मानले व सन्मान केले. हा उपक्रम फारच आयोजनबध्द गरजवंतासाठी उपयुक्त ठरला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन दत्त प्रसाद पातकर यांनी केले.