*कोकण Express*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग दुसऱ्यांदा फेरनिवड*
*कासार्डे ; संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.
संतोष नाईक यांनी संघटनेच्या माध्यमातून केलेली सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांची पुन्हा दुसऱ्या वेळी फेरनिवड करण्यात आली आहे.संतोष नाईक यांनी यापूर्वी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदावरती चांगली कामगिरी करुन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटना बांधणी करण्याचे काम केले. त्याबरोबर संघटनेच्या माध्यमातून विविध विषयांवरती आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.त्याबरोबर ते रिक्षा,टॅक्सी चालक मालक संघटनेच्या कोकण विभागाचे विभागीय कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
याबाबतचे फेरनिवडीचे नियुक्ती पत्र कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे यांचे हस्ते व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांचे हस्ते देण्यात आले.
तसेच रत्नागिरी जिल्हा संघटक म्हणून विकास पेजे यांची फेरनिवड तर रत्नागिरी जिल्हा सचिव म्हणून सागर कळबंटे यांची निवड जाहीर करुन मान्यवरांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.
त्यावेळी उपस्थित राष्ट्रीय पदाधिकारी श्री.नवघनं, रामदास खोत, राज्य उपाध्यक्ष श्री.दवणे, राज्य सचिव राकेश शिंदे, राज्य निरीक्षक घन:शाम सांडीम, रत्नागिरी जिल्हा संघटक विकास पेजे, सागर कळंबटे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर उपस्थित होते.
संघटनेचे कार्य व उदिष्ट याविषयी सविस्तर मार्गदर्शन प्रमोद केसरकर यांनी केले व त्यानंतर संघटना वाढीबद्दल संदर्भात चर्चा करण्यात आली.त्यानंतर पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.शेरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी आभार घन:शाम सांडीम यांनी मानले.