*कोकण Express*
*न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज फोंडाघाटचा विद्यार्थी आयुष पेडणेकर चित्रकला स्पर्धेत राज्यात पहिला तर देशात पाचवा*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजीन्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज फोंडाघाटचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेला विद्यार्थी आयुष सुरेंद्र पेडणेकर हा इंडियन टॅलेंटऑलिंपियाड स्पर्धेत राज्यात प्रथम तर देशात पाचवा आला आहे.प्रशालेमध्ये प्रसिद्ध उद्योजिका मानसी दीपक माजगावकर मॅडम यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला .सत्कार प्रसंगी माजगांवकर मॅडम यांनी त्याला रोख रक्कम 5000 रुपये व शुभेच्छा देखील दिल्या व अशी रत्न शाळेत निर्माण झाल्यास शाळेचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाहीअसे उद्गार मनोगतातून व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस खजिनदार आनंद मरये संचालक संचालक संजय आग्रे रंजन नेरूळकर संदेश पटेल मनीष गांधी सचिन ताएशेटे सरपंच संजना आग्रे प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर माजी विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.आयुष पेडणेकर याचे या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.