देवगडच्या पूर्वा केतकरची नॅशनल कॅरम स्पर्धेसाठी निवड

देवगडच्या पूर्वा केतकरची नॅशनल कॅरम स्पर्धेसाठी निवड

*कोकण Express*

*देवगडच्या पूर्वा केतकरची नॅशनल कॅरम स्पर्धेसाठी निवड*

*बांदा ः प्रतिनिधी*

मुंबईतील दादर येथे पार पडलेल्या ५६ व्या महाराष्ट्र स्टेट कॅरम चॅम्पियनशिप मध्ये पूर्वा दीपक केतकर हिने यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा पार पडली होती. ग्रामसेवक दीपक केतकर यांची मुलगी व रोणापाल गावचे माजी सरपंच प्रकाश गावडे यांची नात पूर्वा केतकरची नॅशनल कॅरम स्पर्धेत निवड झाली आहे. पूर्वा दीपक केतकर ही देवगड इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. पूर्वाच्या निवडीबाबत देवगड कॅरम असोसिएशनच्या वतीने भरण्यात आले आहे.पुर्वा हीला लहानपणापासून कँरम खेळाची आवड होती. तिच्या आई वडीलांनी पुर्वा ला या खेळासाठी नेहमी प्रोहत्सान दिले. तसेच तीला देवगड कँरम असोसिएशनचे चे सुद्धा सहकार्य लाभले. पुर्वा केतकर हीचे या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!