*कोकण Express*
*भौगोलिक विविधतेचा वारसा जपणारी भित्तीपत्रिकेचे प्रकाशन:*
*जीवनाच्या यशस्वीतेसाठी धाडसाने सामोरे जा : डॉक्टर हेमंत पेडणेकर*
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील भूगोल विभागाच्या वतीने, आंतरराष्ट्रीय भूगोल दिन साजरा करण्यात आला. भौगोलिक दिनविशेष, भूगोल विषयांमधील विविध संकल्पना, मकर संक्रमण, प्राचीन काळातील हिम्मयुगाचा प्रभाव आणि विविध शोध, तसेच भौगोलिक विविधतेने नटलेल्या व पर्यावरणीय घटकांची जाणीव करून देणाऱ्या, भितीपत्रिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे, कीर्ती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, डॉ. हेमंत पेडणेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझले हे होते.
प्रमुख पाहुणे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, भूगोल या विषयांमध्ये सायन्स व कला या सर्वच विषयांचा अभ्यास केला जातो. पूर्वीचा वर्णनात्मक स्वरूपाचा असणाऱ्या विषयांमध्ये आज आमुलाग्र बदल झालेला आहे. जीआयएस व जीपीएस सारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, भूगोल विषयाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी धाडसाने विषयांमधील नवीन ज्ञान घेणे गरजेचे आहे. अनेक क्षेत्रांमध्ये अशा नाविन्यपूर्ण शिक्षण घेतलेल्या व्यक्तींची आवश्यकता असते. त्यामुळे असे नाविन्यपूर्ण शिक्षण घेऊन, स्वतःच्या जीवनासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले, विद्यार्थ्यांनी सतत उपक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे. बाजारातील मागणीनुसार, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन परिपूर्ण राहिले पाहिजे. भूगोलासारख्या विषयांमधील अध्ययनाने अनेक प्रकारच्या व्यावसायिक नोकरीची संधी मिळू शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट करून, प्रयत्न केले पाहिजेत.
या भूगोल दिनाचे आयोजन, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी केले होते. कुमारी सिद्धी बागवे हिने सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी भूगोल विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते.