*कोकण Express*
*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ज्ञानेश्वर केळजी व शरद मेस्त्री यांचा सत्कार*
भाजपा तालुका कार्यालयात मातोंड चे प्रभारी ज्ञानेश्वर केळजी यांची वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस शरद मेस्त्री यांची विश्वकर्मा समाजाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल दोघांचा सत्कार पक्षाच्या वतीने करण्यात आला .
*चप्पा चप्पा भाजपा*
राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजींनी प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये भाजपचे प्रतिनिधित्व दिसले पाहिजे असा संदेश सर्व कार्यकर्त्यांना दिला , त्यामुळे सर्वच ठिकाणी आता भाजपा शिवाय इतर कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी सत्तास्थानी दिसणार नाहीत याची दक्षता भाजपा कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांनी व्यक्त केली .
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत ताऺडेल , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , ता.चिटनीस समीर कुडाळकर , किसान मोर्चा चे बापु पंडित , नगरसेविका श्रेया मयेकर , परबवाडा उपसरपंच पपु परब , प्रकाश रेगे यांनी दोघांच्या निवडीबद्दल व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , शक्ती केंद्र प्रमुख नितीन चव्हाण , बुथ प्रमुख रवींद्र शिरसाठ , संदीप देसाई , ग्रा.पं.सदस्य संतोष सावंत , अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , युवा मोर्चाचे मनोहर तांडेल तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते .