*कोकण Express*
*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तुळस येथील दिक्षा दिनेश तुळसकर यांना ” जिजाऊ पुरस्कार ” प्रदान*
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने दरवर्षी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ” जिजाऊ पुरस्कार ” देण्यात येतो . यावर्षीही तुळस येथील दिक्षा दिनेश तुळसकर हीला तिच्या घरी जाऊन सरपंच रक्ष्मी रा.परब यांच्या हस्ते सन्मानपत्र , शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ओजस्वी पणे ज्यांनी घडवलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील गृहीणी , जिने काबाडकष्ट करून जागृती , कस्तुरी व विजय या तिन्ही मुलांचं पालनपोषण करुन , त्यांना कुठल्याही क्लासला न पाठवता घरीच अभ्यास घेऊन विविध स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी प्रवृत्त केले व त्यांना राज्यस्तरीय बक्षिसे मिळविण्यासाठी मेहनत घेतली . आई वडिलांनी शिवणकाम करून मुलांचे भवितव्य उज्वल बनविण्यासाठी काबाडकष्ट केले . त्यांच्या या मातृत्वाच्या प्रेरणेची दखल घेत ह्यावर्षीचा ” जिजाऊ पुरस्कार ” सौ.दिक्षा दिनेश तुळसकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर हीने पुरस्कार देण्याबद्दल चे प्रयोजन व भाजपा करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेविका श्रेया मयेकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसिका मठकर , अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , सुजाता पडवळ , माजी सरपंच शंकर घारे , शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर , तुळस उपसरपंच सचिन नाईक , तंटामुक्ती अध्यक्ष मंदार तुळसकर , ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर , रुपेश कोचरेकर , शेखर तुळसकर , प्रथमेश सावंत इत्यादी उपस्थित होते .