मालवण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे प्रशालेचे दुहेरी यश

मालवण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे प्रशालेचे दुहेरी यश

*कोकण Express*

*मालवण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे प्रशालेचे दुहेरी यश*

मालवण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशेलेला दुहेरी यश प्राप्त झाले आहे. माध्यमिक गटात विद्यार्थी निर्मित फवारणी यंत्र या उपकरणास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून या उपकरणाची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनातसाठी निवड झाली आहे. इयत्ता आठवीतील कु. निखिल प्रकाश भावे या विद्यार्थ्यांने अगदी टाकाऊ वस्तूंचा वापर करून स्वकल्पनेने कु. आदित्य कृष्णा घाडीगांवकर या आपल्या वर्ग मित्राच्या मदतीने हे उपकरण बनविले असून स्पर्धेत उत्कृष्ट पद्धतीने त्याची मांडणी करुन प्रभावीपणे परीक्षकांना व इतरांना माहिती दिली आणि त्याची उपयुक्तता समाजावून सांगितली. तसेच शिक्षक निर्मित बल आणि गतीविषयक या विज्ञान शिक्षक श्री. व्ही. डी. काणेकर यांच्या उपकरणास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.या उपकरणाची जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली आहे. गेली अनेक वर्षे श्री. काणेकर सर तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात उज्ज्वल यश प्राप्त करत आहेत. या यशाबद्दल कु. निखिल भावे, कु. आदित्य घाडीगांवकर आणि श्री. काणेकर सर यांचे संस्थाअध्यक्ष श्री. बाबु बाणे, उपाध्यक्ष श्री. अच्युत भावे, सरचिटणीस श्री. तुषार राऊत, कार्याध्यक्ष श्री. शंकर घाडीगांवकर, सहसचिव श्री. विजय घाडीगांवकर, खजिनदार श्री. भाऊराव घाडीगांवकर,सर्व कार्यकारिणी सदस्य शालेय समिती अध्यक्ष श्री. उत्तम गांवकर, सदस्य श्री. दिपक चव्हाण, श्री. दशरथ घाडीगांवकर, श्री. संतोष गांवकर, मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे, सर्व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!