*कोकण Express*
*बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कुडाळ तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे दिमाखानात उद्घाटन समारंभ झाला संपन्न*
*कुडाळ ःःप्रतिनिधी*
मंगळवार दिनांक ३ रोजी कुडाळ तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले जयंती चे औचित्य साधुन करण्यात आले या वेळी पक्षाचे जिल्हा प्रमुख संजयजी आंग्रे साहेब महिला जिल्हा प्रमुख वर्षा ताई कुडाळकर तालुका प्रमुख योगेश तुळसकर महिला उप जिल्हा संघटिका शींदे म्याडम रांगणेकर म्याडम अगरवाल म्याडम गडकरी भाउ तसेच पक्षाचे तालुका पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी जिल्हा प्रमुख संजयजी आंग्रे यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तर वर्षी ताई कुडाळकर व योगेश तुळसकर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले,हिंदूरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंचे अनावरण करण्यात आले. या वेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.