*कोकण Express*
*स्वच्छता दूत बनून केला आगळा वेगळा थर्टी फस्ट साजरा*
*श्रावणी व मेधांश काँम्य्पुटर आणि तळेरे पत्रकार संघ यांचा सलग सहाव्या वर्षीचा उपक्रम!*
३१ डिसेंबर हा दिवस देवगड-पोंभुर्ले येथे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यंदा सहाव्या वर्षी अनोख्या पद्धतीने श्रावणी आणि मेधांश कंप्यूटर्स कासार्डे या संगणक प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
श्रावणी आणि मेधांश कंप्यूटर कासार्डेच्या विद्यार्थ्यानी पाश्चात्य संस्कृती साजरी करत असताना देखील मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांबद्दल नव तरुणाईला माहित करून देत परिसर स्वच्छते बरोबरच वैचारिक स्वच्छता महत्वाची आहे हा वेगळा आदर्श घालून दिला आहे.
या दोन्ही संगणक प्रशिक्षण संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकीचे बीज रुजवण्याच्या प्रयत्नाने सतत नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असतात, आणि यातून आम्हा अनेकांना ही प्रेरणा मिळत असते व्यसनमुक्ती कार्यात ही संचालिका श्रावणी मदभावे यांनी विलोभनीय कार्य करत असताना हा उपक्रम ही तितकाच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरेचे प्राचार्य श्री. अविनाश मांजरेकर यांनी केले.
३१ डिसेंबर जगभरात सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये बहुतांश कार्यक्रम पाश्चात्य संस्कृती प्रमाणे मद्यधुंद होऊन साजरे होताना दिसतात. या अशा कार्यक्रमांना तोड देनारा आणि युवा नेतृत्व घडवणारा म्हणून हा कार्यक्रम ओळखला जाऊ लागला आहे.
यावेळी श्रावणी कंप्यूटर तळेरे आणि मेधांश कंप्यूटर कासार्डे च्या विद्यार्थ्यानी आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक परिसराची स्वच्छता करून वनभोजनाचा आस्वादा घेण्यात आला. नंतर व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन आलेल्या पाहुण्यांनी केले व व्यसनमुक्ती वर शपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाला दर्पणकारांचे वंशज श्री. प्रभाकर जांभेकर, वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. अविनाश मांजरेकर,
उमेद फाउंडेशन चे सदस्य तथा पूर्ण प्राथमिक शाळा मापारवाडी चे शिक्षक जाकीर शेख, तमन्ना शेख,
तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, सचिव संजय खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते शशांक तळेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव
चित्रकार अक्षय मेस्त्री, कल्पेश तळेकर
तंबाखू प्रतिबंध अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. श्रावणी मदभावे, गौरी सारंगे, राहुल सोमले, स्मितेश पाष्टे आदी उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर तर मान्यवरांचे आभार सतीश मदभावे यांनी केले.