वेंगुर्ले तालुक्यात उपसरपंच निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचेच वर्चस्व.

वेंगुर्ले तालुक्यात उपसरपंच निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचेच वर्चस्व.

*कोकण Express*

*वेंगुर्ले तालुक्यात उपसरपंच निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचेच वर्चस्व. .. .. .. .*

*८ पैकी ६ ठिकाणी भाजपचे उपसरपंच*

*वेंगुर्ले तालुक्यात भाजपा च एक नंबर चा पक्ष असल्याचे सिद्ध झाले –प्रसन्ना देसाई (जिल्हा सरचिटणीस )*

वेंगुर्ले तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यातील उपसरपंच निवडीत भाजपा चे 10 उपसरपंच निवडून येत तालुक्या मधे वर्चस्व निर्माण केले असताना आज 29/12 ला झालेल्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा आठ पैकी सहा ठिकाणी भाजपा चे उपसरपंच विजयी होऊन वेंगुर्ले तालुक्यामध्ये भाजपा ची विजयी घोडदौड चालूच ठेवली. आज वेंगुर्ले तालुक्या मधे अणसूर आडेली , कोचरा , चिपी , परुळे बाजार , रेडी , होडावडा , मेढा या आठ ग्रा. प. च्या उपसरपंच पदाच्या निवडणुका होत्या. या मध्ये आडेली , होडावडा ,परुळे बाजार , चिपी या ग्राम पंचायतीत भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आले.
*उपसरपंच पदाचे विजयी उमेदवार*
१) आडेली – परेश चंद्रकांत हळदणकर
२) चिपी – प्रकाश बाबाजी चव्हाण
३) परुळे बाजार – संजय उर्फ राजू आत्माराम दुधवडकर
४) होडावडा – राजबा रमाकांत सावंत
हे बिनविरोध निवडून आले.
तसेच रेडी व अणसुर ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताने विजयी झाले .
५) रेडी – नमीता संजय नागोळकर ह्या १० विरुद्ध ३ मतांनी विजयी .
६) अणसुर – वैभवी शांताराम मालवणकर ह्या ५ विरुद्ध ३ मतांनी विजयी.
सर्व विजयी उमेदवारांचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई व तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर यांनी अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!