*कोकण Express*
*न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फोंडाघाटचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 23 24 डिसेंबर रोजी संस्थेचे चेअरमन मा. सुभाष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.पहिल्या सत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. आमदार श्री बाळाराम पाटील शिक्षक आमदार कोकण मतदारसंघ.श्रीमती रूपाली पाटील साहस प्रतिष्ठान वेंगुर्लेचे अध्यक्ष.फोंडाघाट मधील प्रसिद्ध कवी शशिकांत तिरोडकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले .प्रशालेतील दोन विद्यार्थ्यांना वसंत कला विश्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले शिक्षकांनी आपल्या अध्यापनात प्रामाणिक राहून विद्यार्थी घडविण्यास तत्पर रहावे. शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे.शासन दरबारी मी नेहमी आपल्या रास्त मागण्या मांडण्याचं काम करीत असून अनेक मागण्या मार्गी लावण्याचे काम देखील झालं आहे .यापुढे देखील आम्ही प्रयत्न करत राहू अशी ग्वाही देखील त्यांनी कार्यक्रम प्रसंगी दिली. श्रीमती रूपाली पाटील यांनी आपण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना राबवित आहोत त्या देखील मांडण्याचा प्रयत्न केला .त्या विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत याची जाणीवही त्यांनी आपल्या मनोगतामध्ये करून दिली .त्याचबरोबर संस्थेचे संचालक मा.रंजन नेरुरकर यांनी देखील संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त करीत संस्थेच्याअडचणी सुध्दा मांडल्या. फोंडाघाटचे प्रसिद्ध कवी शशिकांत तिरोडकर यांनी देखील मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी मा.चंद्रशेखर लिंग्रस खजिनदार मा. आनंद मर्ये स्कूल कमिटी चेअरमन बबन पवार संचालक संजय आग्रे ,राजू पटेल ,संदेश पटेल ,सचिन तायशेटे ,प्रशालेचे मुख्याध्यापक,मा.एस ए.सावंत , प्रशालेचे माजी विद्यार्थी ,पालक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सायंकाळी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला त्यावेळी मराठीतील प्रसिद्ध अभिनेते अभय खडपकर उपस्थित होते. त्यानी विद्यार्थ्यांना उदबोधित करत फोंडाघाट बद्दलच्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी सूत्रसंचालन प्रा. संतोष जोईल तर उपस्थितांचे आभार मा. पारकर सर यांनी मानले.