*कोकण Express*
*सिंधुदुर्ग वारकरी संप्रदायाचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न…*
*संतसेवा पुरस्कारांचे वितरण; वारकरी दिनदर्शिकेचेही प्रकाशन…*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा जिल्हा वारकरी मेळावा सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातर्फे देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या “संतसेवा’ पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प. गाड महाराज, ह.भ.प. सिताराम परब महाराज, ह.भ.प. गणपत पांचाळ महाराज आदींचा सन्मान झाला. तर वारकरी दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट दिली. त्यांचा वारकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ महाराज गवंडळकर, कार्याध्यक्ष ह.भ.प. रामचंद्र कदम महाराज, उपाध्यक्ष ह.भ.प. सावळाराम कुर्ले महाराज, खजिनदार ह.भ.प. मधुकर प्रभूगांवकर महाराज, जिल्हा सचिव राजू राणे व इतर पदाधिकारी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील वारकरी व नागरिक या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांतर्गत काही पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली. त्यात सावंतवाडी युवा अध्यक्षपदी ह.भ.प. केतन सावंत (रा. कुणकेरी) व वैभववाडी तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. तुषार पवार (मृदंगमणी) यांचा समावेश आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा युवा अध्यक्ष ह.भ.प. पंढरीनाथ सावंत तसेच सांतवाडी तालुका अध्यक्ष व सर्व तालुक्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी आणि जिह्यातील सर्व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.