*कोकण Express*
*आंगणे वाडी भराडी देवी साठी गणेश कदम यांच्या वतीने सोलर लाईट सुपूर्द*
*मालवण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणे वाडी भराडी देवी साठी गणेश कदम यांच्या वतीने देवीच्या गाभाऱ्यात लावण्यासाठी अद्यावत सोलर लाईट मंदिर कमिटीचे पदाधिकारी श्री.रुपेश आंगणे यांच्या कडे मनसेचे कल्पेश सावंत यांच्या मार्फत सुपूर्द केली. भराडी देवीची सेवा करण्याची संधी दिल्या बद्दल गणेश कदम यांनी मंदिर कमिटीचे आभार मानले.