*कोकण Express*
*तलावाच्या कठड्याच्या कामाचा दीपक केसकरांच्या हस्ते शुभारंभ…*
येथील मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याच्या कामाचा शुभारंभ आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना श्री. केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान हे काम सुरू करण्यात आल्यामुळे सावंतवाडीकरांसह विशेषता जेष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष नारायण राणे, शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, ज्येष्ठ नेते तानाजी वाडकर, आबा केसरकर,भारती मोरे, माधुरी वाडकर,नीता कविटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.