वैभववाडीच्या गार्गी रावराणे हिचे अबॅकस गणित परीक्षेत यश

वैभववाडीच्या गार्गी रावराणे हिचे अबॅकस गणित परीक्षेत यश

*कोकण Express*

*वैभववाडीच्या गार्गी रावराणे हिचे अबॅकस गणित परीक्षेत यश*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी ( राववाडी ) येथील १३ वर्ष व ११ महिन्याची कुमारी गार्गी गायत्री गिरीश रावराणे या विद्यार्थिनीने अबॅकस गणित (abacus mathematics) या परीक्षेत संपूर्ण भारतात Level-1A Rank ने उत्तीर्ण झाली आहे त्याबद्दल तिचे मनपुर्वक हार्दिक अभिनंदन..

त्याच बरोबर गर्गिने खेळात ही प्रावीण्य मिळवले आहे. ती १६ वर्षा खालील झालेल्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या Mumbai School Sports Association च्या टुर्नामेंट मध्ये फातिमा हायस्कूल घाटकोपरचे प्रतिनिधीत्व केले शाळेला जेतेपद मिळवून दिले.

अभ्यास व मैदानी खेळाची सांगड घालत यशाला गवसणी घालणाऱ्या कुमारी गार्गी गायत्री गिरीश रावराणे हिच्या कामगिरीला मनापासून सलाम.

कुमारी गार्गी ही सांगुळवाडी (राववाडी)चे दाम्पत्य श्री गिरीश मोहन रावराणे व सौ गायत्री गिरीश रावराणे यांची कन्या आहे.

कुमारी गार्गीला भविष्यात चार्टर्ड अकाऊटंट व एमबीए (फायनान्स) या अभ्यासक्रमात प्राविण्य मिळवून करियर करायचे आहे.

कुमारी गार्गी व तिच्या कुटुंबीयांचे पुन्हा एकदा मनपुर्वक हार्दिक अभिनंदन व मनापासून शुभेच्छा. तिने भविष्यात देखील असेच यश संपादन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!