हायवे प्राधिकरणाने कणकवलीकरांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करा

हायवे प्राधिकरणाने कणकवलीकरांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करा

*कोकण Express*

*हायवे प्राधिकरणाने कणकवलीकरांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करा*

*बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी वाय बीम उड्डाण पुल करा शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांची मागणी..*

कणकवली शहरवाशीयांना त्रासदायक असलेल्या बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी वाय बीम उड्डाण पुल करा अशी मागणी गांगो मंदिर येथील रहिवाशांनी केलीय यावेळी आंदोलन कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे अन्यथा काम न करू देण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी भेट देऊन आंदोलन करताना आम्ही तुमच्या पाठीशी असून मला कधीही बोलवा त्या ठिकाणी मी येण्यासाठी तयार आहे अशी ग्वाही संदेश पारकर यांनी दिली.

यावेळी आंदोलन कर्त्यांशी संवाद साधताना पारकर म्हणाले की, कणकवली शहरातील अनेक कामे प्रलंबित आहेत ती कामे हायवे प्राधिकरणाने पूर्ण करावीत अशी मागणी शहरवासीयांची आहे.परंतु हायवे प्राधिकरणाने नागरिकांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही . अनेक रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे झालेलं आहे अनेकांचे जमिनी हायवेमध्ये गेलेल्या आहे त्यांचे पैसे सुद्धा अजून मिळालेले नाहीत. कणकवली नगरपंचायतीचा पाणीपुरवठा आहे त्याच सुद्धा अद्याप काम झालेलं नाही तसेच अंडरग्राउंड गटार अजून झालेली नाहीत त्याचप्रमाणे सर्विस रोड केले गेले ते सुद्धा योग्य नसल्यामुळे वाहतुकीचा खेळ खंडोबा होत आहे

महामार्गाच काम अजूनही पूर्ण झाले नसताना सुद्धा टोल वसुलीचे काम हाती घेतले जात आहे सुरू त्याला सुद्धा शिवसेनेने ,व्यापारी महासंघाने तसेच सिंधुदुर्गवाशीयांनी टोल वसुलीला विरोध केला आहे. जे जे काम केले गेले आहेत जे आपल्याला जाचक आहे तिथे आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी ,या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत, उदय सामंत ,वैभव नाईक यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या ज्या लोकांनी हायवेसाठी योगदान दिलं त्यांना कधी हायवे प्राधिकरणाने सहकार्य केलं नाही. जनतेच्या मागण्यांना बाजूला सारून आपलं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. तो सुद्धा हवे संपूर्ण निकृष्ट दर्जाचा झालेला आहे जोपर्यंत हायवे प्राधिकरण आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही तोपर्यंत अशाच प्रकारच्या आंदोलन वेळोवेळी करावे लागणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!