शिवसेनेचा भाजपा सरचिटणीस,असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांना जोरदार धक्का – राजा म्हसकर

शिवसेनेचा भाजपा सरचिटणीस,असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांना जोरदार धक्का – राजा म्हसकर

*कोकण Express*

*शिवसेनेचा भाजपा सरचिटणीस,असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांना जोरदार धक्का – राजा म्हसकर*

*कोळोशी,असलदे,आयनल गावची पंचवीस वर्षाची सत्ता भाजपने गमावली; आगामी काळात शिवसेना जोरदार लढणार*

कणकवली तालुक्यातील कोळोशी,असलदे,आयनल या तीन गावांमध्ये गेली २५ पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टी(केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विचारांची) पुरस्कृत सत्ता होती.मात्र,या ग्रामपंचायत निवडणुकीत असलदे आणि कोळोशी या दोन गावांमध्ये शिवसेनेचा सरपंच विजयी झाले आहेत.तर आयनल गावामध्ये गाव विकास पॅनलचा सरपंच विजय झाला आहे.या तीन गावातील सत्ता गेल्याने भाजपा सरचिटणीस तथा असलदे माजी सरपंच पंढरी वायगणकर यांना जोरदार धक्का बसला आहे.आगामी काळात शिवसेना जोरदार लढणार असल्याचा इशारा नांदगाव शिवसेना शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी दिला आहे.

भाजपाचे तालुका सरचिटणीस म्हणून कोळोशी, असलदे येथील भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांच्या मार्गर्शनाखाली निवडणूक लढवल्या गेल्या.मात्र तीनही ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन झाले आहे.नांदगाव पंचायत समिती मध्ये केवळ नांदगाव गावची सत्ता भाजपाला मिळाली आहे,शिवसेनेची ताकद आम्ही विरोधकांना दाखवली आहे,त्यामुळे किंगमेकर कोण झालं हे जनतेला माहीत आहे,असा टोला राजा म्हसकर यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!