कणकवलीत उड्डाणपूल दुरुस्तीचे काम नगरसेवक शिशिर परुळेकर, महेश सावंत यांनी रोखले

कणकवलीत उड्डाणपूल दुरुस्तीचे काम नगरसेवक शिशिर परुळेकर, महेश सावंत यांनी रोखले

*कोकण Express*

*कणकवलीत उड्डाणपूल दुरुस्तीचे काम नगरसेवक शिशिर परुळेकर, महेश सावंत यांनी रोखले…!*

आधी बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या; मगच काम सुरू करा…!

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली एस.एम.हायस्कूल समोरील उड्डाणपूल दुरुस्तीचे काम दिलीप बिल्डकाँन कंपनीने हाती घेतले आहे. त्यानुसार बॅरिकेट लावण्यात आले असून संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आजपासून काम करत होते.दरम्यान भाजपा नगरसेवक सुशील परुळेकर, महेश सावंत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी हायवे ठेकेदाराच्या चुकीमुळे विजेचा शॉक लागून बाळकृष्ण तावडे मृत्यू प्रकरणातील नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

महामार्ग प्राधिकरण आणि वीज वितरण कंपनीकडून बाळकृष्ण तावडे यांचा मृत्यू दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या चुकीमुळे झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यात महामार्ग प्राधिकरण संबंधित कुटुंबियांना दिलीप बिल्डकॉन कंपनीने मदत करावी असेही नमूद केले आहे. तरी देखील दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून अद्यापही तावडे कुटुंबीयांना कोणतीही मदत दिलेली नाही. नुकसान भरपाई म्हणून तातडीने मदत द्यावी,त्यानंतरच कणकवली शहरात काम चालू करावे, अशी भूमिका शिशिर परुळेकर आणि महेश सावंत यांनी मांडली.श्री.परुळेकर यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करत जोपर्यत नुकसान भरपाई देत नाही,तोपर्यंत काम बंद करा,असे सांगत काम बंद केले आहे. यावेळी सागर राणे व कणकवली शहरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!