हळवल ग्रामपंचायतवर भाजप चा झेंडा फडकला ; विरोधकांना चारली धूळ

हळवल ग्रामपंचायतवर भाजप चा झेंडा फडकला ; विरोधकांना चारली धूळ

*कोकण Express*

*हळवल ग्रामपंचायतवर भाजप चा झेंडा फडकला ; विरोधकांना चारली धूळ*

*हळवल गावच्या सरपंच पदी अपर्णा अशोक चव्हाण ५९८ च्या मताधिक्याने विजयी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूका होऊ घातल्या अन् निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. हळवल गावात भाजप पुरस्कृत उमेदवार विरुद्ध उ. ठा. शिवसेना तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्ष अशी लढत होती. सेनेच्या दोन्ही गटाकडून हळवल मध्ये भाजपचा सरपंच पदाचा उमेदवार पाडण्यासाठी निवडणूकीच्या रात्रीपर्यंत देखील मोठ्या प्रमानात प्रयत्न केले गेले. मात्र मागील अडीज वर्ष गावच्या विकासात राजकारण नको म्हणून पक्षीय कार्यकर्ते शांत राहिले होते. मात्र ग्रामस्थांनी विश्वास ठेवून निवडून दिलेली व्यक्तीच भ्रष्टाचारी आणि पक्षीय काम करू लागल्याने भ्रष्टाचाराने त्यांना घरी पाठवले आणि निवडणुकीनंतर भाजपचा सरपंच हळवल ग्रामपंचायत मध्ये निवडून आला.

मात्र मागील ग्रामपंचायत बॉडी बिनविरोध झाली अन् सगळ्याच गोष्टींना ब्रेक लागला होता. नंतर हळवल चे राजकारण हे भ्रष्टाचार विरुद्ध असल्याने निवडणूक लागल्यावर मतदानाच्या सहाय्याने विरोधकांना विजयाच्या माध्यमातून धूळ चारत विजय मिळवला.

तर सदस्य पदासाठी सचिन मोहन ठाकूर २०५, सान्वी भरत गावडे २३१, भारती महेश तांबे २०३, रसिका गुरव २४८ मोठ्या बहुमताने विजयी झाले. आम. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी ही लढत लढवली होती. संपूर्ण इतिहासात भाजपचा सरपंच हा हळहल ग्रामपंचायत वर मोठ्या बहुमताने विकासाचे व्हिजन घेऊन निवडून आले.

आम. नितेश राणेंच्या विकसात्मक शब्दावर हळवल वासीयांचा विश्वास – नवनिर्वाचित सरपंच अपर्णा चव्हाण

नवनिर्वाचित सरपंच अपर्णा चव्हाण यांनी सांगितले की, भाजपची सरपंच म्हणून निवडून आली तरी हे सगळं यश माझ्या गावच्या जनतेला जाते. आम. नितेश राणेंच्या विकासात्मक शब्दावर विश्वास ठेऊन जनतेने मला निवडुन दिले. मी माझा पूर्ण वेळ गावच्या विकासासाठी देईन असा विश्वास देखील अपर्णा चव्हाण यांनी हळवल वासीयांना दिला आहे. हळवल मधील ब्रेकच्या विळख्यात सापडलेल्या कामांना आता वेग मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!