पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा पुतळा जाळत कणकवली भाजपकडून निषेध

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा पुतळा जाळत कणकवली भाजपकडून निषेध

*कोकण Express*

*पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा पुतळा जाळत कणकवली भाजपकडून निषेध…!*

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल भाजप कार्यकर्ते आक्रमक…!*

*आम.नितेश राणे माजी आम. प्रमोद जठार यांची उपस्थिती…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी यानी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल कणकवली भाजपाच्या वतीने बिलावल भुट्टो जरदारी यांचा पुतळा जाळत त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपच्या वतीने पाकिस्तान च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी भुट्टो जरदारी यांच्या पुतळ्याला जोडे देखील मारण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, शहराध्यक्ष प्राची कर्पे, युवा मोर्चाचे गणेश तळगावकर, पप्पू पुजारे, महेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रज्वल वर्दम, रवींद्र गायकवाड, बाळा पाटील, प्रदीप ढवण, संजना सदडेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, अजय घाडी, सागर राणे, विजय चिंदरकर, तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, संजय ठाकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नीम का पत्ता कडवा है, बिलावल भुट्टो भडवा है, पंतप्रधान नरेंद्र मोदी तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है, हमसो जो टकरायेगा मिट्टी में मिल जायेगा अशा जोरदार घोषणा देत बिलावल भुट्टो चा निषेध करण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी स्वतः या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!