*कोकण Express*
*ग्रा.पं.निवडणुकीच्या अनुषंगाने कनेडी, करूळ व फोंडाघाट मध्ये पोलिसांचे संचलन…!*
*पोलिसांकडून कायदा, सुव्यवस्था राखण्याचे केले आवाहन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार संपायला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असताना कणकवली तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडाव्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने कणकवली मधील कनेडी, करूळ व फोंडाघाट या ठिकाणी पोलिसांनी आज संचलन केले. संचलन करत असताना पोलिसांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्वच जनतेने शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासह सहाय्यक पोलीस
निरीक्षक सागर खंडागळे व अन्य पोलीस अधिकारी, एस आर पी एफ ची तुकडी व होमगार्ड यांच्यासह कर्मचारी उपस्थित
होते.