*कोकण Express*
*नांदगाव येथे मोफत प्रशिक्षण रेडीमेड गारमेंट उद्योजकता विकास कार्यक्रम*
*नांदगाव प्रतिनिधी*
जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग आयोजित अनुसूचित जाती प्रवर्गातील बेरोजगार युवक व युवतीसाठी नांदगाव येथे 1 महिना कालावधीचा रेडीमेड गारमेंट उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित कलेला आहे.सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रात्यक्षिकासह सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील उद्योग संधी ,उद्योजकीय पाहणी ,तंत्र उद्योग विषयक कायदे, व रजिस्ट्रेशन,उद्योगाचे व्यवस्थापन ,उद्योजकीय प्रेरणा व गुणसंपदा, कौशल्य विकास व स्वयंमुल्यांकन शासनाचे व बँकांचे कर्ज विषयक धोरण व प्रकल्प अहवाल याबाबत माहिती देण्यात येणार असून सदर प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्येकी १ महिना कालावधीचा असून यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थीस १०००/- रु.विद्यावेतन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उमेदवार हा किमान ७ वी पास तसेच १८ ते ४५ वयोगटातील असावा .कोणत्याही वित्तीय संस्थेचा किंवा बँकेचा थकबाकीदार नसावा.इच्छुक उमेदवाराने अधिक माहितीसाठी किशोर मोरजकर ट्रस्ट नांदगाव संचालित शुभांगी तंत्र प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग श्री.ऋषिकेश मोरजकर मो नं.९०९६५६४४१०/९४०३३६७९०३ यांच्याशी दि.२५.१२.२०२२ पर्यंत संपर्क साधावा.असे एम सी.इ.डी. ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आवश्यक कागदपत्रे १. फोटो २.आधार कार्ड ३.मार्कलीस्ट ४. शाळा सोडल्याचा दाखला ५.जातीचा दाखला ६. बँक पासबुक ६.विवाह नोंदणीचा दाखल