*कोकण Express*
*रवींद्रनाथ मुसळे यांचा मृत्यू अनकंट्रोल मधुमेहामुळे…*
*कणकवली पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील रहिवासी व शहराच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी असणारे कणकवली रोटरी क्लब चे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाथ वसंत मुसळे (६८) यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने व अन कंट्रोल मधुमेहामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कणकवली पोलिसात या रवींद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत महादेव सुरेश मुसळे यांनी कणकवली पोलिसात खबर दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की रवींद्रनाथ मुसळे यांचा काल कणकवलीत एक अपघात झाला. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचाराकरता कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दरम्यान आज सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने व अन कंट्रोल मधुमेहा मुळे निधन झाले अशी माहिती पोलिसांनी दिली.