*कोकण Express*
*फोंडाघाट गावांमधील गांगोवाडी येथे मनसे शाखेची स्थापना*
*मनसेत गांगोवाडी ग्रामस्थांचा प्रवेश*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
कणकवली येथील फोंडाघाट गावातील गांगोवडी येथे मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांच्या उपस्थितीत मनसे शाखेची स्थापना करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष राजन दाभोळकर व उप जिल्हाध्यक्ष दयानंद मेस्त्री यांच्या उपस्थितीत गांगोवाडी येथील ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश करून घेण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, उपजिल्हाध्यक्ष दयानंद मेस्त्री, तालुका अध्यक्ष दत्ताराम बिरवाडकर, तालुका सचिव संतोष कुडाळकर, उपतालुका अध्यक्ष अनंत आचरेकर, उपतालुका अध्यक्ष गुरुनाथ भालेकर, विभाग अध्यक्ष दत्ताराम अमृते, शहराध्यक्ष प्रसाद हळदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.