*कोकण Express*
*आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणुकीला सामोरे जा कणकवलीचे डी. वाय. एस पी. श्री विनोद कांबळे यांचे आवाहन*
*कासार्डे ; संजय भोसले*
येत्या 18 डिसेंबरला होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत शांततेने व संपूर्ण आचारसंहितेचे पालन करून पार पाडाव्यात ,कुठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही ,याची काळजी उमेदवार ,त्यांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी घेणं गरजेचं आहे .निवडणुका होतात आणि जातात पण एकमेकांची मने दुखावल्यास ,त्याचे दूरगामी परिणाम त्या परिसरामध्ये घडत असतात .याचं भान प्रत्येकाने ठेवावे .पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. अशी ग्वाहीही डी.वाय.एस् .पी विनोद कांबळी यानी दिली .ते कासार्डे विद्यालयाच्या डिजिटल हॉलमध्ये तळेरे —कासार्डे दशक्रोशीतील राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते , ग्रामस्थ, आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कणकवली तालुक्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर ,पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे, कासार्डे बीट अंमलदार चंद्रकांत झोरे ,कासार्डे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एन. सी. कुचेकर व कासार्डे, तळेरे ,ओझरम, दारूम गावचे पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कणकवली तालुका पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित ठेवा. गावात शांतता असू द्या ,प्रशासनाला सहकार्य करून कोणत्याही वादाशिवाय निवडणुका पार पाडण्याचा आदर्श निर्माण करा.
सदर कार्यक्रमाचे आयोजन ,कासार्डे पोलीस पाटील महेंद्र सदाशिव देवरुखकर व दारोम पोलीस पाटील संजय बिळसकर यांनी केले होते. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासार्डे ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक अनिल जमदाडे यांनी केले. या कार्यक्रमाला कासार्डे— तळेरे दशक्रोशीतील लोकप्रतिनिधी ,त्यांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी तळेरेचे सामाजिक कार्यकर्ते राजेश माळवदे यांनी मांडलेल्या उपस्थितांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.