*कोकण Express*
*बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी किसन मांजरेकर यांची निवड*
*ब्रिगेडियर सुधीर सावंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान*
*मालवण ः प्रतिनिधी*
बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सचिव पदी मालवण येथील किसन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय येथे शनिवारी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत मांजरेकर, नाटेकर खोत यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार या नियुक्त्या देण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी सांगितले.
यावेळी मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, कणकवली विधनासभा क्षेत्रप्रमुख संदेश सावंत-पटेल, मालवण तालुकाप्रमुख विश्वास गावकर, राजा गावकर, कुडाळ मालवण महिला संघटक प्रमुख निलम शिंदे, उपतालुका प्रमुख भारती घारकर, ऋत्विक सामंत, हर्षद पाटकर, कमालाकांत पाटकर, कविता मोंडकर, निकिता मोंडकर, भाई नेरकर यासह अन्य उपस्थित होते.