*कोकण Express*
*बाळासाहेबांची शिवसेना मालवण शहरप्रमुख पदी बाळू नाटेकर यांची नियुक्ती*
*मालवण ः प्रतिनिधी*
बाळासाहेबांची शिवसेना या संघटनेच्या मालवण शहरप्रमुखपदी बाळू नाटेकर तर मसुरे, आचरा विभाग विभाग मालवण उपतालुका प्रमुखपदी पराग खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात आज शनिवारी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत बाळू नाटेकर, पराग खोत यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार या नियुक्त्या देण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी सांगितले.
जिल्हा सचिव पदी मांजरेकर यांची नियुक्ती
दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सचिव पदी मालवण येथील किसन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिली
यावेळी मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, कणकवली विधनासभा क्षेत्रप्रमुख संदेश सावंत-पटेल, मालवण तालुकाप्रमुख विश्वास गावकर, राजा गावकर, कुडाळ मालवण महिला संघटक प्रमुख निलम शिंदे, उपतालुका प्रमुख भारती घारकर, ऋत्विक सामंत, हर्षद पाटकर, कमालाकांत पाटकर, कविता मोंडकर, निकिता मोंडकर, भाई नेरकर यासह अन्य उपस्थित होते.