*कोकण Express*
*आलिशान कारला जोरदार धडक बसल्यामुळे भीषण अपघात*
भरधाव वेगात जाणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने जात समोरून येणाऱ्या दुसऱ्या आलिशान कारला जोरदार धडक बसल्यामुळे भीषण अपघात झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मळगाव भगवती मंगल कार्यालया समोर घडली.
या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अपघाताची तीव्रता लक्षात घेता सुदैवाने दोन्ही गाड्यातील मिळून एकूण सात ते आठ प्रवासी बालबाल बचावले. त्यातील काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
दरम्यान नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघात ग्रस्त एक कार मळगावच्या दिशेने येत होती तर दुसरी कार सावंतवाडीच्या दिशेने जात होती. यावेळी मळगावच्या दिशेने येणाऱ्या कार समोर बंद असलेला कंटेनर आल्याने त्यांनी आपली गाडी विरुद्ध दिशेला वळवली. यावेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला त्याची जोरदार धडक बसली.
या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता सुदैवाने दोन्ही गाड्यातील एकूण सात ते आठ प्रवासी बालंबाल बचावले. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध आडव्या आल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. मात्र अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली आहे तर पोलीस दाखल होण्यापूर्वी नागरिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडविण्यात आली होती.