*कोकण Express*
*कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने उदय सामंत यांचा वाढदिवस साजरा करणार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस शनिवार, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने कणकवली श्रीधर नाईक चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे हे उपस्थित राहणार आहेत. या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील शिवसैनिक व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, नगरपंचायत गटनेते सुशांत नाईक यांनी केले आहे.