*कोकण Express*
*कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे दोन संघ अजिंक्य*
*कासार्डे:- संजय भोसले*
न्यु. इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथील पार पडलेल्या शालेय कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलांच्या आणि 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले असून त्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.१९वर्षाखालील मुलांच्या संघाने उपविजेता पदापर्यंत धडक मारून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
यशस्वी खेळाडूंना सौ.पुजा पाताडे,यशवंत परब,अनिल जमदाडे यांच्यासह क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,सौ.रजनी कासार्डेकर,ऋषीकेश खटावकर, नवनाथ कानकेकर ,सौ.वैष्णवी डंबे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
१४वर्षा खालील मुलांच्या संघात अभिषेक आडे (कॅप्टन ),सुमित राठोड,चेतन पवार,परशुराम राठोड,
मनोज जाधव,प्रणय पवार,गौरेश शिंदे,सुमित राठोड,भूपेश सुतार,अर्शद हुलिकेरी,प्रथमेश पवार,
तेजस आईर आदी खेळाडूंचा समावेश आहे, तर
१४वर्षाखालील मुलींच्या संघात नेहा पन्हाळकर. (कर्णधार),नंदिनी चव्हाण
लक्ष्मी पवार,आश्विनी चव्हाण,दिक्षा पाताडे,भार्गवी खानविलकर,ऋती मिसळ, जान्हवी रणम,काजल चव्हाण,प्रगती निकम,मयुरी दळवी आदी यशस्वी खेळाडूंचा समावेश आहे.
तर या स्पर्धेत कासार्डे ज्यु.
कॉलेज मधील १९वर्षा खालील मुलांचा संघही उपविजेता ठरला आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक यशवंत परब,सौ.पुजा पाताडे व अनिल जमदाडे यांच्यासह विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,सौ.रजनी कासार्डेकर, नवनाथ कानकेकर, सौ.वैष्णवी डंबे व ऋषिकेश खटावकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर व सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व पदाधिकारी, प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत..