*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील १२ ज्युदोपट्टूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
*कासार्डेत आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी निकाल जाहीर*
*कासार्डे:- संजय भोसले*
सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ज्युनिअर निवड चाचणीत कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 ज्युदोपट्टूची निवड झाली आहे.
या जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी जिल्हाभरातून 50पेक्षा अधिक ज्युदोपट्टूंनी हजेरी लावली होती.कोल्हापूर येथे महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आयोजित 49 राज्यस्तरीय स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी घेण्यासाठी राज्य स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 पुरूष व 6महिला खेळाडू मिळून 12 ज्युदोपट्टू आपले कसब दाखविणार आहेत.
उपस्थित खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे स्वागत जिल्हा सचिव दत्तात्रय मारकड यांनी करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेला अभिजित शेट्ये व सोनु जाधव आदींनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
*या निवड चाचणी स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-*
*मुलांच्या विविध वजनी गटात…* *-५५कि.ग्रॅ.वजन गटात*
१)तेजसराव दळवी, (सावंतवाडी)-प्रथम
२)वैभव माने
(कासार्डे)-द्वितीय
३)मयुरेश जाधव
(सावंतवाडी)-तृतीय
४)श्लोक मर्यें(करुळ)-तृतीय
*-६०कि.ग्रॅ.वजन गटात*
१)भावेश चव्हाण
(करुळ)-प्रथम
२)बाळू जाधव
(कासार्डे)-द्वितीय
३)प्रथमेश राठोड
(सावंतवाडी)-तृतीय
*-६६कि.ग्रॅ.वजन गटात*
१)साहिल पाटील
(आंबोली)-प्रथम
*-७३कि.ग्रॅ.वजन गटात*
१)प्रथमेश गुरव
(करुळ)-प्रथम
२)गजानन माने
(कासार्डे)-द्वितीय
*-८१कि.ग्रॅ.वजन गटात*
१)यज्ञेश भीमगुडे
(आंबोली)-प्रथम
२) सुरज शेलार
(कासार्डे)-द्वितीय
*-९०कि.ग्रॅ.वजन गटात*
१)हंबीरावं देसाई
(कासार्डे)-प्रथम
२)विनायक पाटील
(आंबोली)-द्वितीय
३)म. डिसोझा(करुळ)-तृतीय
३)संकेत राठोड(कासार्डे)-तृतीय
*मुलींच्या गटात-*
*-४४कि.ग्रॅ.वजन गटात*
१)कस्तुरी तिरोडकर
(करुळ)-प्रथम
२)संध्या पटकारे
(कासार्डे)-द्वितीय
*-४८कि.ग्रॅ.वजन गटात*
१)स्नेहल शिंदे
(आंबोली)-प्रथम
*-५२कि.ग्रॅ.वजन गटात*
१)प्रतीक्षा गावडे
(सावंतवाडी)-प्रथम
२)अफसा करोल
(सावंतवाडी)-द्वितीय
*-५७कि.ग्रॅ.वजन गटात*
१)प्रतीची तारी(करुळ)-प्रथम
२)सानिका चिंदरकर
(कासार्डे)-द्वितीय
*-६३कि.ग्रॅ.वजन गटात*
१)तन्वी पवार(फोंडाघात)- प्रथम
२)अंकिता पाटील
(आंबोली)द्वितीय
*-७०कि.ग्रॅ.वजन गटात*
१)शिवानी म्हात्रे
(सावंतवाडी)-प्रथम आली आहे.
या निवड चाचणीसाठी ज्युडो प्रशिक्षक दिनेश जाधव,श्री. शिंदे, अजिंक्य पोफळे आदी उपस्थित होते.
या यशस्वी खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कुलकर्णी, सचिव दत्तात्रय मारकड,पदाधिकारी अभिजित शेट्ये,राकेश मुणगेकर,रूपेश कानसे,
सिध्देश माईणकर, निळकंठ शेट्ये,राहुल शेट्ये,व सोनु जाधव आदींनी अभिनंदन करुन ९,१०व ११डिसेबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या सर्व खेळाडूंचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.