यात्रेकरुसाठी श्रमदानातून तयार केला रस्ता

यात्रेकरुसाठी श्रमदानातून तयार केला रस्ता

*कोकण Express*

*यात्रेकरुसाठी श्रमदानातून तयार केला रस्ता*

दत्त जयंती निमीत्त गडगेसकल, फोंडाघाट येथे दरवर्षी यात्रेनिमित्त हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. कारण ही यात्रा पंचक्रोशीतील महत्त्वपुर्ण मानली जाते. परंतु भाविकांना मंदिरापर्यंत येण्या-जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्यामूळे मंदिरापर्यंत वाहने जाऊ शकत नव्हती. अशा प्रसंगी यात्रेकरूसाठी रस्त्याची सोय करुन देण्यासाठी कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या राष्ट्रीय छात्र सेना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी दत्त जयंतीचे औचित्य साधून श्रमदानातून 500 मीटर लांबीचा रस्ता तयार केला. हा रस्ता तयार करण्यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे तसेच गडगेसकल गावातील नागरीकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले यांनी प्रोत्साहन दिले. तर या श्रमदानाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेनेचे असोशियट एन. सी.सी. अधिकारी लेफ्ट. डॉ. राज ताडेराव व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी. सी. कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयसेवक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!