*कोकण Express*
*बांदा पोलिसांनी तब्बल २१ लाखाची दारू केली जप्त…*
*बांदा ः प्रतिनिधी*
येथील पोलिसांनी आज तब्बल २१ लाख रुपयाची दारु पकडली आहे. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गावरच्या पंजाबी ढाब्यासमोर करण्यात आली. भुषण सुरेश राजम (रा. मुंबई) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडुन २१ लाख ४३ हजाराच्या दारुसह एकुण ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई बांदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे , राजेंद्र शेळके , प्रथमेश पोवार , कपिल हळदे यांनी केली.