*कोकण Express*
*निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीला उभे असलेले उमेदवार नाराज मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा निगुडे गावचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांची प्रशासन व लोकप्रतिनिधींवर सडकून टीका*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या परंतु यापूर्वी निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीमध्ये होत होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित राहायचे परंतु यावर्षी ऑनलाईन उमेदवारी अर्ज अर्ज, मग ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया थांबवली अडथळे यायला लागले छाननी निवडणूक, चिन्ह, उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे तर सावंतवाडी शहरात उमेदवारांना यावे लागते ४० ते ५० किलोमीटर अंतर कापून एक तर एसटी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नसताना काही उमेदवारांची तर पूर्णपणे कसरत होत चालली या सर्व प्रशासनाच्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आज सावंतवाडी तालुक्यात थेट सरपंच पदासाठी १८६ उमेदवार रिंगणात असून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ९१४ उमेदवार आहेत या सर्वांना आपण गावाकडे प्रचार करणार की सावंतवाडी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे येऊन भेटणार पूर्ण दिवस त्या ठिकाणी वाया जातो एकतर निवडलेली जागा ही त्या ठिकाणी अपुरी पडत आहे या प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का की फक्त जिल्हाधिकारी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्याचे काम करणार एकंदरीत पाहायला गेलो तर संपूर्ण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असताना अशा ठिकाणी प्रत्येक तालुक्यात उमेदवारांना प्रवासाने कसरत करावी लागत आहेत काही ठिकाणी महिला सरपंच पद आरक्षण असल्यामुळे त्यांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही या सर्व गोष्टीचा प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता परंतु तसे घडले नाही आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार, खासदार मंत्री गप्प का आहेत फक्त राजकीय दावे करून सरपंच पद बसवण्यापेक्षा या गोष्टीकडे लक्ष द्या सावंतवाडी तहसील पदाचा चार्ज प्रभारी तहसीलदारांकडे आहे त्या ठिकाणी अनेक कामे रेंगाळलेली आहेत त्यामुळे सावंतवाडी तहसीलदारांची तात्काळ नेमणूक करावी जेणेकरून या सर्व गोष्टींना कुठेतरी अडचण निर्माण होते ती दूर होऊ शकते कारण तहसीलदारांना विचारलं तर माझ्याकडे प्रभारी चार्ज आहे मी काय करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे असे त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले