*कोकण Express*
*कणकवली पोलीस पेट्रोल पंपावरील खासगी कर्मचारी आंदोलनावर ठाम..*
*पेट्रोल पंप २४ तास उलटले तरी बंद राहिल्याने ग्राहकांची गैरसोय;पोलीस अधीक्षक साहेब लक्ष देतील का?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली येथे पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलीस कल्याण निधीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियमचा पेट्रोल डिझेल पंप गेल्या ४ वर्षा पासून चालू करण्यात आला आहे.या पेट्रोल पंपावर खाजगी कंत्राटी कामगार १२ जण कार्यरत आहेत. अचानक खासगी कंत्राटदराने या कर्मचाऱ्यांचा वेतन १ हजार रुपयांनी कमी केल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रविवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून काम बंद आंदोलन छेडले असून २४ तास उलटले तरी आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने चर्चेसाठी एक प्रतिनिधी पाठवला होता. त्याने कोणतीही कागदपत्रे व किमान वेतन देण्याबाबत आश्वासन न दिल्याने हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.
कणकवली पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलीस कल्याण निधी अंतर्गत मानव संसाधन विभागामार्फत हिंदुस्तान पेट्रोलियमचा पंप पेट्रोल व डिझेल पंप चालवण्यात येत आहे .या पंपावर खाजगी लेबर ठेकेदाराकडून गेल्या चार वर्षापासून रोखपाल, हिशोबनीस व पेट्रोल,डिझेल सोडणारे कर्मचारी असे दहा ते बारा कर्मचारी कार्यरत आहेत.त्या ठिकाणी एका नव्याने एका संस्थेला ३० तारीख पासून ठेका देण्यात आला आहे. त्याने अचानक वेतन कमी केल्यामुळे गेल्या चार वर्षापासून कार्यरत असलेले कर्मचारी संतप्त झाले आहेत.किमान वेतन प्रमाणे मानधन मिळावे, प्रोव्हेडंड फंड व अन्य मागण्यासाठी काम बंद आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे.यामुळे सबंधित ठेकेदाराने या कामगारांना काढून टाकण्याचा इशारा दिला आहे.यामुळे सबंधित कर्मचारी उद्या पोलीस अधीक्षकांना भेटणार आहेत.यावेळी पोलीस अधीक्षक काय निर्णय घेणार याकडे लक्ष सर्वांचे आहे.
संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशांत घाडीगावकर,अमोल नाईक,भिकाजी कदम, महेश कदम, किशोर गुरव, ओंकार चव्हाण, निलेश राणे, दीपक मडवळ, मंगेश सावंत, राजेश परब,शिवराम दळवी, प्रसाद घाडी आदीचा सामावेश आहे. आहेत .