*कोकण Express*
*भाजपाच्या डोंबिवली ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सुहासीनी उर्फ मनिषा राणे यांचे वेंगुर्ले भाजपा च्या वतीने स्वागत*
*वेंगुर्ले तालुक्यातील महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मदत करणार ; सौ. सुहासिनी उर्फ मनिषा राणे*
भाजपाच्या डोंबिवली ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी उर्फ मनिषा राणे यांनी वेंगुर्ले तालुका कार्यालयाला भेट दिली असता महीला मोर्चाच्या शहर अध्यक्षा सौ.प्रार्थना हळदणकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , जि.का.का.सदस्य बाळा सावंत उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. सुहासिनी उर्फ मनिषा राणे यांनी सांगितले की डोंबिवली मध्ये मी , मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम करत आहे . तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पालकमंत्री म्हणून रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम उत्तमरीत्या चालू आहे . त्यामुळे भविष्यात वेंगुर्ले तालुक्यातील सुन म्हणुन जातीने लक्ष घालून महीलांना आत्मनिर्भर बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर हीने महीला कार्यकर्त्यांच्या अडचणी मांडल्या , तसेच वेंगुर्ले तालुक्यातील महीलांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावे , अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी महीला मोर्चाच्या ता.सरचिटनीस वृंदा गवंडळकर , नगरसेवीका श्रेया मयेकर – साक्षी पेडणेकर – ईशा मोंडकर , अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , वृंदा मोर्डेकर , आकांक्षा परब , श्रद्धा धुरी , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष दिपक नाईक , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर , वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर , बुथप्रमुख संदिपकुमार बेहरे – दादा तांडेल , रमेश नार्वेकर इत्यादी उपस्थित होते .