*कोकण Express*
*कुडाळात रंगणार गवळदेव खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सव*
*दि. २४ ते २६ डिसेंबर कालावधीत आयोजन*
*सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा, खेळ पैठणीचा, रेकॉर्ड डान्स आणि बरेच काही*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
येथील श्री देव गवळदेव मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्री गवळदेव मित्रमंडळ आणि उत्सव कमिटीच्या वतीने दि. २४, २५ आणि २६ डिसेंबर २०२२ रोजी श्री गवळदेव खाद्य व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गवळदेव मंदिराच्या बाजूला शिरसाट कंपाउंड मध्ये या महोत्सव होणार आहे. या निमित्ताने शोभायात्रा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर, सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, खेळ पैठणीचा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेआहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याबरोबरच विविध स्पर्धांमध्ये सुद्धा स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन श्री गवळदेव मित्रमंडळ, कुडाळचे अध्यक्ष दादा पडते आणि श्री गवळदेव उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रशांत राणे तसेच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कुडाळ येथील श्री गवळदेव मंदिराला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने या श्री गवळदेव खाद्य व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी सर्वाना प्रवेश मोफत असणार आहे.
श्री गवळदेव सांस्कृतीक व खाद्य महोत्सव 2022 ही सिंधुदुर्गवासिय
महिलावर्गासाठी शॉपिंग महोत्सव आहे. विविध गेम व बक्षिसे जिंकण्याची संधी या महोत्सवामध्ये उपलब्ध आहे. डान्स, ऑर्केस्टा, मिमिक्री, खेळ पैठणीचा, सुंदर व्यक्तीमत्व स्पर्धा, आणि बरच काही या महोत्सवामध्ये अनुभवायला मिळणार आहे. तसेच चित्ररथ, ढोलपथक, लहान मुलांसाठी कार्टून, प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आणि। अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कोणतीही प्रवेश फ्री नाही, अगदी मोफत प्रवेश आहे.
दि. २४ डिसेंबर पासून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते वाजता श्री गवळदेव मंदिर पटांगण येथे रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ३ वाजता मिरवणूक, चित्ररथ, ढोलपथक, बैलगाडी सजावट आणि पपेट शो. सायंकाळी ५ वाजता उदघाटन सोहळा, नृत्याविष्कार आणि मान्यवरांचे सत्कार, ६ वाजता देशभक्तीपर कलामहोत्सव, रेकॉर्ड डान्स सादरीकरण, ७ वाजता विशेष आकर्षण खेळ पैठणिचा व गाण्याचा कार्यक्रम होईल.
रविवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक पुरस्कृत व्यवसाय मार्गदर्शन व संधी यावर व्याख्यान, सायंकाळी ५ वाजता साईकला कला मंच पिंगुळी कुडाळ यांचे नृत्याविष्कार व गायन, वेगवेगळे मनोरंजन कार्यक्रम, रात्री ८ वा. विष्णू शिरोडकर गोवा यांचा ऑर्केट्रा. सोमवार दि. दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता रक्तदान शिबीर, सायंकाळी ५ वाजता नृत्याविष्कार, वेगवेगळे मनोरंजन कार्यक्रम, ७ वाजता सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा होईल. यात ७.१५ ते ८ स्पर्धकांची ओळख व रॅम्प वॉकींग पहिले राऊंड, रेकॉर्ड डान्स सादरीकरण, ८ ते ९ प्रश्नोत्तरे व पारंपरीक वेषभूषा व रॅम्प राउंड दुसरे आणि राऊंड रेकॉर्ड डान्स सादरीकरण. रात्री ९ ते १० प्रश्नोत्तरे व वेस्टर्न वेषभूषा व रॅम्प राउंड तिसरे राऊंड. त्यांनतर १० वाजता बक्षीस वितरण होणार आहे. त्याचबरोबर बच्चे कंपनीसाठी खास कार्टून आणि इतर विशेष आकर्षण असणार आहेत. स्पर्धांसाठी आणि इतर माहितीसाठी 94223 79400 या क्रमांकावर संपर्क साधावा.
श्री गवळदेव मित्रमंडळ आणि उत्सव कमिटी कुडाळ आयोजित श्री गवळदेव खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन मित्रमंडळाचे अध्यक्ष दादा पडते आणि उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रशांत राणे तसेच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.