हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे दत्तजयंती सोहळा!

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे दत्तजयंती सोहळा!

*कोकण Express*

*हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे दत्तजयंती सोहळा!*

*मसुरे ःःप्रतिनिधी* 

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित देवगड तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे बुधवार ०७ डिसेंबर २०२२ रोजी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी ७:०० ते ९:०० श्री गणेश पूजा, पादुका पूजन, पुण्यवाचन, होमहवन,सकाळी ९:०० ते ११:०० लघुरुद्र, सकाळी ११:०० ते १२:०० पालखी सोहळा,
दुपारी १२-२५ महाआरती, दुपारी १:०० ते २:३० तीर्थ प्रसाद, दुपारी ३:०० ते ७:००
नामस्मरण आणि भक्तीमय कार्यक्रम,
सायं ७:०० वा. २०x२० डबलबारी भजनाचा जंगी सामना कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ,बुवा सुजित परब विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री. रामचंद्र (बाबा) चोपडेकर यांच्यात होणार आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!