बिबट्याच्या त्या दोन बछड्यांचा झाला मृत्यू

बिबट्याच्या त्या दोन बछड्यांचा झाला मृत्यू

*कोकण Express*

*बिबट्याच्या त्या दोन बछड्यांचा झाला मृत्यू*

*कुडाळ ःःप्रतिनिधी* 

कुडाळ तालुक्यातील वालावल शिरसोडवाडी येथील श्री. सुशांत चंद्रकांत मणेरकर यांच्या शेतविहीरीमध्ये भक्ष्याच्या मागे धावताना पाण्यात पडल्याने सुमारे दीड वर्ष वयाचे वन्यप्राणी बिबटचे दोन मादी बछडे मृत आढळून आल्याची माहिती कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अमृत शिंदे यांनी दिली.
याबाबत पोलीस पाटील उमेश शृंगारे यांनी वनपाल नेरूर त हवेली श्री धुळु कोळेकर यांना माहिती दिली असता वनपरिक्षेत्र कुडाळच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन सुमारे तीस फूट खोल विहिरीतून मृत बछड्यांना पिंजऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढले.
पशुवैद्यकीय अधिकारी कुडाळ श्री. ठाकूर यांनी शवविच्छेदन केले. पाण्यात बुडून श्वास गुदमरून सदर बछडयांचा मृत्यू झाला असलेचे त्यांनी सांगितले. मृत बछड्यांचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याची खात्री केले नंतर त्यांना शासकीय जागेमध्ये दहन करण्यात आले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री.अमृत शिंदे यांनी जखमी वन्यप्राणी नागरिकांना आढळ्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याबाबतचे आवाहन केले. जेणे करून त्यांना वेळीच रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवता येईल.
उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. एन. रेड्डी, मानद वन्यजीव रक्षक श्री. नागेश दफ्तरदार यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ तथा सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. अमृत शिंदे, वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, सिंधुदुर्ग वाईल्ड लाईफ इमरजन्सी रेस्क्यू संस्थेचे अनिल गावडे, वाहनचालक राहुल मयेकर यांनी सदर कार्यवाही पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!