*कोकण Express*
*ठाकरे युवा सेनेचे वायरी विभाग प्रमुख भाजपात*
*गणेश सातार्डेकर यांच्या प्रवेशाने भाजपला बळ*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण वायरी भुतनाथ येथील युवासेना विभागप्रमुख गणेश हनुमंत सातार्डेकर यांनी आज सोमवारी भाजप पक्षात प्रवेश केला. मालवण भाजप कार्यालय येथे पक्षप्रवेश घेण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, महेश मांजरेकर, मुन्ना झाड, युवमोर्चा तालुका प्रभारी मंदार लुडबे, शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, सरचिटणीस निषय पालेकर, विलास मुणगेकर, विजय कदम, सुशील शेडगे, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते.