*कोकण Express*
*ग्रामपंचायत निवडणुका भाजपा आणि शिंदे गट एकत्र लढणार ; काही ठिकाणी कार्यकर्त्यांना मुभा…*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेलींची सावंतवाडीत घोषणा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आगामी काळात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका भाजपा आणि शिंदे गट एकत्र येवून लढणार आहे तसा फाॅर्मुला ठरला आहे, अशी घोषणा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
याबाबत आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी स्थानिकांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. शक्य असलेल्या ठिकाणी ही युती असेल, संख्याबळ असेल त्या ठिकाणी पर्याय असेल असेही त्यांनी सांगितले. श्री तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.यावेळी महेश सारंग,मनोज नाईक,संजय आग्रे,अशोक दळवी,महेश धुरी,संजय माजगावकर,परिक्षित मांजरेकर,नारायण राणे,दिलीप भालेकर,केतन आजगांवकर,शेखर राणे,सुनिल पारकर,महेद्र सावंत,भूषण परूळेकर आदी उपस्थित होते.