*कोकण Express*
*कै.सिताराम( आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
कै. सिताराम ( आबा) सखाराम तर्फे सर यांच्या स्मरणार्थ कै. सिताराम (आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट, जांभवडे बामणवाडी या ट्रस्टच्या वतीने दरवर्षी 27/11/2022रोजी त्यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून जांभवडे पंचक्रोशीतील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. सन2022-23चा माध्यमिक विभागातून आदर्श शिक्षक पुरस्कार न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे या प्रशालेत गेली अनेक वर्षे उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणारे मुख्याध्यापक श्री. शंकर शांताराम सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. तर प्राथमिक विभागातून पुर्ण प्राथमिक शाळा फणसवणे, ता. संगमेश्वर जिल्हा. रत्नागिरी या शाळेतून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करुन सेवा निवृत्त झालेले जांभवडे बामणवाडीचे सुपुत्र श्री. अरुण शांताराम सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. कै. सिताराम तर्फे सर यांच्या नावाने सुरू केलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. आदर्श शिक्षक पुरस्कार कै. सिताराम तर्फे सर यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीचे प्रतिक म्हणून दिले जातात. या पुरस्काराबद्दल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा तर्फे, सचिव श्री. वामन तर्फे आणि इतर विश्वस्तांनी श्री. शंकर सावंत आणि श्री. अरुण सावंत यांचे अभिनंदन केले.