२६ /११ च्या हल्ल्यातील शहिदांना उद्या कणकवलीत आदरांजली

२६ /११ च्या हल्ल्यातील शहिदांना उद्या कणकवलीत आदरांजली

*कोकण Express*

*२६ /११ च्या हल्ल्यातील शहिदांना उद्या कणकवलीत आदरांजली*

*उपस्थित राहण्याचे आम्ही कणकवलीकर ग्रुपचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबईवरील भ्याड हल्ल्यातील शहिदांना उद्या कणकवली पोलीस स्टेशन येथे आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या हल्ल्याला चौदा वर्षे सरली. २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी तसेच राज्य घटना दिनानिमित्त संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र जमून आणि “पेटवून एक-एक ज्योत” उजळू दे कणकवली’ हा श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न करणार आहोत. संविधानाबद्दल डॉ.मिलिंद कुलकर्णी माहिती देतील. कणकवली पोलीस स्टेशन जवळ 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. सोबत प्रत्येकाने एक मेणबत्ती आणावी, असे आवाहन ‘आम्ही कणकवलीकर’ चे डॉ.सुहास पावसकर, विनायक(बाळू) मेस्त्री, अशोक करंबेळकर आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!